मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्युच्युअल फंड योजनांचे माहिती दस्तऐवज सुलभ करण्यासाठी नियम जारी केले आहेत. बाजार नियामक सेबीने म्हटले आहे की, या नियमाच्या अंमलबजावणीमुळे गुंतवणूकदारांना योजनेबद्दल अधिक माहिती मिळेल आणि त्यांना सर्व पैलू समजून घेणे सोपे होईल. आणि हा नवा नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे.
बाजार नियामक सेबीच्या मते, 1 एप्रिल 2024 पासून, फंड हाऊसना योजनांचा सारांश नवीन स्वरूपात शेअर करावा लागेल. ज्या म्युच्युअल फंड योजनेची कागदपत्रे आधीच सेबीकडे जमा आहेत त्यांना हा नियम लागू होणार नाही. या परिपत्रकानुसार, योजनेचे टॉप-10 होल्डिंग्स आणि निधी वाटप वेब लिंकवर टाकावे लागेल.
फंड मॅनेजरने स्वत: कोणत्या फंडात किती गुंतवणूक केली आहे, याचीही माहिती द्यावी लागेल. तसेच, अर्जाच्या माहिती मेमोरँडम, योजना माहिती दस्तऐवजाच्या पहिल्या पानावर रिस्कोमीटरचा उल्लेख करावा लागेल. याद्वारे, गुंतवणूकदारांना ही योजना त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे समजू शकेल. कोणत्याही योजनेबाबत तरलतेची माहितीही द्यावी लागेल. मार्केट रेग्युलेटर सेबीने सांगितले की, वेबलिंकवर योजनेचे 6 महिन्यांचे TER आणि फॅक्टशीट देणे आवश्यक असेल.