बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शेअर बाजार सल्लागार कंपनी वेल्थित ग्लोबलचे मालक मोहित मंगनानी यांना स्टॉक मार्केटमधून 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्याच्या सोबत मार्केट रेग्युलेटरने त्याला 30 लाखांचा दंडही ठोठावला आहे.
तसेच SEBI ने मोहित मंगनानी यांना कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून काम करण्यास किंवा SEBI नोंदणीकृत मध्यस्थ म्हणून 5 वर्षांच्या कालावधीसाठी बंदी घातली आहे. सेबीने मंगनानी यांना नियामकाच्या ‘स्कोअर’ प्लॅटफॉर्मवर आलेल्या सर्व तक्रारींचे तीन महिन्यांत निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.
SEBI ने मंगनानी विरुद्ध एक पक्षीय आदेश पारित केला होता आणि त्यांनी नंतर सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाकडे (SAT) संपर्क साधला, ज्याने केस परत सेबीकडे पाठवले आणि नवीन आदेश पारित करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शुक्रवारी बाजार नियामकाने हा आदेश दिला आहे.
सप्टेंबर 2018 पासून नोटिसीच्या विरोधात 53 तक्रारी प्रलंबित आहेत आणि मंगनानी यांनी त्यांचे निराकरण करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, असेही सेबीने नमूद केले आहे.
सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, नोटीस देणार्याने (मंगनानी) तपासणीदरम्यान सेबीला सहकार्य केले नाही आणि पत्त्यातील बदल आणि व्यवसाय बंद करण्याबाबतची माहिती उघड न करून ग्राहकांची फसवणूक केली.