गॅस कंपन्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना मोठा धक्का दिला. ऐन सणासुदीच्या काळात एलपीजी सिलिंडरच्या दरात २०९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली असून, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती कायम राहतील. आता दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1731.50 रुपयांना मिळणार आहे.
मेट्रो शहरांमधील एलपीजी सिलिंडरच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे आता 1522.50 रुपयांऐवजी 1731.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर 1636 रुपयांऐवजी 1839.50 रुपयांना, मुंबईत 1482 रुपयांऐवजी 1684 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 1695 रुपयांऐवजी 1898 रुपयांना मिळणार आहे.
याआधी सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरची किंमत १५७ रुपयांनी कमी केली होती. मार्च महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेली ही पहिलीच मोठी वाढ आहे. याआधी 1 मार्च 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 350 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यासोबतच एलपीजी कंपनीपाठोपाठ आणखी गॅस कंपनीही दरात वाढ करणार असल्याचे मानले जात आहे.