केंद्रीय अप्रत्यक्ष कर बोर्ड अर्थात सीबीआयसी विशेषत: कस्टम विभागांतर्गत विविध विभागांनी केलेल्या सुधारणांमुळे भारताच्या व्यापार सुलभ रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या डिजिटल आणि टिकाऊ व्यापार सुलभतेच्या जागतिक सर्वेक्षणात भारताची स्थिती लक्षणीय सुधारली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सर्वेक्षणात भारताने 99.32 टक्के गुण मिळविले आहेत, तर 2019 च्या तुलनेत 78.49 टक्के होते.
जगभरातील 143 अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन केल्यानंतर, २०२१ च्या सर्वेक्षणात भारताची स्थिती पारदर्शकता, संस्थागत व्यवस्था आणि सहकार्य, पेपरलेस व्यापार यासह अनेक बाबतीत सुधारली. सर्वेक्षणात म्हटले आहे की दक्षिण व दक्षिण पश्चिम आशिया प्रदेश आणि आशिया पॅसिफिक प्रदेशापेक्षा भारताने चांगली कामगिरी केली. निवेदनात म्हटले आहे की फ्रान्स, ब्रिटेन, कॅनडा, नॉर्वे, फिनलँड इत्यादी ओईसीडी देशांपेक्षा भारताचे मानांकन चांगले असल्याचे दिसून आले आहे.