ट्रेडिंग बझ – गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1,84,225.43 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांना सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,457.38 अंकांनी किंवा 2.44% वाढला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये फक्त हिंदुस्थान युनिलिव्हरच्या बाजार भांडवलात घट झाली आहे.
टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचे मार्केट कॅप वाढले :-
समीक्षाधीन आठवड्यात, रिलायन्स इंडस्ट्रीजचा एमकॅप 48,238.78 कोटी रुपयांनी वाढून 16,37,408.27 कोटी रुपयांवर पोहोचला. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे मार्केट कॅप 31,325.39 कोटी रुपयांनी वाढून 5,15,887.19 कोटी रुपये झाले तर ICICI बँकेचे मार्केट कॅप 23,472.25 कोटी रुपयांनी वाढून 6,40,949.71 कोटी रुपये झाले. ITC चे बाजार भांडवल 21,003.35 कोटी रुपयांनी वाढून 5,28,377.17 कोटी रुपये झाले.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मार्केटकॅप 19,886.94 कोटी रुपयांनी वाढून 11,76,750.92 कोटी रुपये झाले आणि भारती एअरटेलचे मार्केट कॅप 18,874.22 कोटी रुपयांनी वाढून 4,45,509.68 कोटी रुपये झाले तर इन्फोसिसचे बाजारमूल्य 10,447.1 कोटी रुपयांनी वाढून 5,19,662.10 कोटी रुपये झाले. एचडीएफसी बँकेच्या मूल्यांकनात 8,115.33 कोटी रुपयांची वाढ झाली आणि ती 9,42,052.68 कोटी रुपयांवर पोहोचली व HDFC चे बाजार भांडवल 2,862.07 कोटी रुपयांच्या उडीसह 5,09,126.31 कोटी रुपये झाले. या प्रवृत्तीच्या विरोधात, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे बाजार भांडवल 10,244.22 कोटी रुपयांनी घसरून 5,76,683.68 कोटी रुपयांवर आले.
शीर्ष कंपन्यांची यादी :-
टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, इन्फोसिस, एसबीआय, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.