ट्रेडिंग बझ – 5 वेळा आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा त्रास काही संपत नाही आहे. जसप्रीत बुमराहनंतर आता मुंबई इंडियन्सचा आणखी एक वेगवान गोलंदाज स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, हॅमस्ट्रिंग (स्नायूंचा ताण) शस्त्रक्रियेमुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामात दिसणार नाही. इतकंच नाही तर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून झ्ये रिचर्डसनलाही वगळण्यात आलं आहे.
झ्ये रिचर्डसनची कामगिरी :-
हॅमस्ट्रिंगची दुखापत पुन्हा उद्भवल्यानंतर गेल्या आठवड्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिचर्डसनने ट्विट केले की, “दुखापती हा क्रिकेटचा मोठा भाग आहे, ही वस्तुस्थिती आहे, पण निराशाजनक आहे. तथापि, मी आता अशा स्थितीत आहे जिथे मी माझ्या आवडीच्या गोष्टी करू शकतो. अजून चांगला खेळाडू होण्यासाठी मी मेहनत करत राहीन. एक पाऊल मागे, दोन पावले पुढे, चला ते करूया.” रिचर्डसनने ऑस्ट्रेलियासाठी 3 कसोटी, 15 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामने खेळले आहेत.
जसप्रीत बुमराह पुढील 6 महिने क्रिकेटपासून दूर राहणार :-
झ्ये रिचर्डसन आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी आक्रमणाचा समतोल राखणे फार कठीण जाईल. जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा गोलंदाज असून त्याच्या अनुपस्थितीत संघाच्या गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे. जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. तो पीटच्या दुखापतीशी झुंज देत आहे. नुकतीच बुमराहची न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे. अशा परिस्थितीत तो जवळपास 6 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की बुमराह केवळ आयपीएलसाठीच नाही तर आशिया कपमध्ये टीम इंडियासाठीही खेळू शकणार नाही.