ट्रेडिंग बझ – विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) या महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून तब्बल 2,313 कोटी रुपये काढले आहेत. तथापि, जानेवारीच्या तुलनेत एफपीआय विक्रीचा वेग मंदावला आहे. त्यावेळी विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 28,852 कोटी रुपये काढून घेतले होते, डिपॉझिटरीच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये एफपीआयने शेअर्समध्ये 11,119 कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये 36,238 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
FPI ने 2313 कोटी रुपये काढले :-
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही.के.विजयकुमार म्हणाले की, अमेरिकेतील वाढत्या दरांमुळे भारतासह इतर उदयोन्मुख बाजारपेठांमधून भांडवल बाहेर पडू शकते. आकडेवारीनुसार, 1 ते 24 फेब्रुवारी दरम्यान, FPIs ने भारतीय स्टॉकमधून 2,313 कोटी रुपये काढले आहेत.
हिमांशू श्रीवास्तव, असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर रिसर्च, मॉर्निंगस्टोर इंडिया, म्हणाले, “FOMC बैठकीचे तपशील आणि US मधील निराशाजनक आर्थिक डेटा जाहीर करण्यापूर्वी, FPIs ने सावध दृष्टिकोन स्वीकारला आहे.” चलनवाढ कमी करण्याच्या संथ गतीमुळे, यूएस मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढविण्याची प्रक्रिया दीर्घ कालावधीसाठी सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, FPIs ने समीक्षाधीन कालावधीत डेट किंवा बाँड (मार्केट) बाजारात 2,819 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.