ट्रेडिंग बझ – हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग 9 दिवस घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता अदानीच्या शेअर्सच्या घसरणीला ब्रेक लागला असून गुंतवणूकदार जोरदार खरेदी करत आहेत. त्यामुळेच मंगळवारनंतर बुधवारीही अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बीएसईवर आज सुरुवातीच्या व्यवहारात 10.27% वाढून 1987.60 रुपयांवर पोहोचले. याशिवाय, अदानी विल्मारच्या शेअर्सने आज सलग दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी 5% च्या वाढून अप्पर सर्किटला धडक दिली आहे.
अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती :-
कंपनी शेयर प्राइस(Rs) चेंज (%)
अडानी एंटरप्राइजेज 1912.15 (+6.08%)
अडानी पोर्ट्स 581.35 (+5.07%)
अडानी पावर 175.55 (+1.27%)
अडानी ट्रांसमिशन 1295.95 (+3.54%)
अडानी विल्मर 419.35 (+4.99%)
अडानी ग्रीन 842.75 (-0.05%)
अडानी टोटल 1394.15 (-5.00%)
NDTV 219.10 (+0.99%)
ACC लिमिटेड 2024.70 (+1.46%)
अंबुजा सीमेंट 392.15 +8.45 (+2.20%)
(BSE वर सकाळी 09:20 वाजताच्या व्यवहारानुसार)
अदानीच्या कंपन्यांचे उत्कृष्ट निकाल :-
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या डिसेंबर तिमाहीतील उत्कृष्ट निकालांमुळे शेअर्समध्ये तेजी आहे. आतापर्यंत अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट आणि अदानी ग्रीनचे निकाल जाहीर झाले आहेत. आज बुधवारी अदानी विल्मर आणि अदानी पॉवरचे निकाल जाहीर होणार आहेत.