ट्रेडिंग बझ – कमकुवत जागतिक संकेतांमुळे आजही शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली. आज सकाळी निफ्टी 17,790 आणि सेन्सेक्स 60,511 अंकांवर उघडला. बाजाराच्या कमकुवततेमध्ये मेटल शेअर्स सर्वात जास्त घसरले आहेत. निफ्टीमधील सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्सपैकी HINDALCO, चे शेअर्स 2-2 आणि टाटा स्टील चे शेअर 4-4% टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.
भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांची नजर तिसर्या तिमाहीतील निकालांवर आणि RBI MPC बैठकीच्या निर्णयांवर असेल. सोमवारी बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स प्रत्येकी अर्धा टक्का घसरणीसह बंद झाले होते, (विदेशी गुंतवणूकदार FII) FII ने काल 1,218.14 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. विक्रीमुळे बीएसईवर सूचीबद्ध एकूण कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 266.54 लाख कोटी रुपये झाले.