भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा “वो जब याद आये…” या कार्यक्रमाचे आयोजन भाऊंच्या उद्यानात रविवारी दि. ५ रोजी करण्यात आले होते रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक मिनिट स्तब्ध उभे राहून लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. दीप प्रज्वलन शहराच्या प्रथम नागरिक व महापौर सौ. जयश्री महाजन, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. एम. राजकुमार तसेच रेडिओ पार्टनर म्हणून माय एफ एम 94.3 चे युनिट हेड अदनान देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अनुक्रमे खालील प्रमाणे करण्यात आला.
महापौर जयश्री महाजन यांचा सत्कार प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सौ दीपिका चांदोरकर यांनी केला.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचा सत्कार कार्यकारी विश्वस्त श्री. दीपक चांदोरकर यांनी केला.
रेडिओ पार्टनर म्हणून माय एफ एम 94.3 चे युनिट हेड श्री. अदनान देशमुख यांचा सत्कार सचिव श्री. अरविंद देशपांडे यांनी केला.
कलावंत ऐश्वर्या परदेशी, मानसी अडवणी, मयूर पाटील, मयूर चौधरी, तसेच किरण चौधरी यासोबतच इंदोर येथून खास या कार्यक्रमासाठी आलेले सुसंवादक अविनाश देवळे यांचा सत्कार पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांनी केला. ऋणनिर्देश प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी केला, उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. मृणाल चांदोरकर यांनी केले. आणि सुरू झाला एक सुरेल प्रवास.
वो जब याद आये… या कार्यक्रमात सहभागी झालेले कलावंत हे सर्व जळगावचेच असून अत्यंत गुणी आहेत. गेली अनेक वर्षे ते जळगावच्या सांस्कृतिक विकासात आपले योगदान देत आलेले आहेत. यामध्ये जी गाणी सादर केली गेलीत ती सादर करणारे कलाकार म्हणजे ऐश्वर्या परदेशी, मयूर पाटील, मानसी आळवणी, सौ. प्राजक्ता केदार, किरण कासार हे होते. मयूर चौधरी व किरण चौधरी यांनी गिटार ची उत्तम साथ या कार्यक्रमाला केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खास इंदोर येथून आलेले श्री. अविनाश देवळे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने केले. कलावंतांचा सत्कार पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन डॉ. विवेकानंद कुलकर्णी, महापौर जयश्री महाजन, माय एफएम चे अदनान देशमुख, सौ दीपिका चांदोरकर यांच्याकडून करण्यात आला.
वो जब याद आये… या कार्यक्रमात खालील गाणी सादर करण्यात आली. ओम नमोजी आध्या, लग जा गले, तुझसे नाराज नाही जिंदगी हैराण हूं मै, नाम गुम जायेगा, कुहू कुहू बोले कोयलिया, रैना बित जाये, ओ सजना बरखा बहार आयी, रहे ना रहे हम, वो जब याद आये बहुत याद आये, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी राहू दे, प्यार हुवा एकरार हुवा है, कजरा मोहबत वाला, गम है किसिके प्यार में, मेरे जीवन साथी इ. एकापेक्षा एक गाणी अप्रतिम रित्या सादर झालीत या गाण्यासोबत दोन अप्रतिम नृत्य सादर झाली या तिन्ही कलावंत डॉ. अपर्णा भट यांच्या शिष्या व प्रभाकर कला संगीत च्या कलाकार होत्या. चलते चलते या पाकिझा चित्रपटातील अजरामर गीतावर व उई मा उई मा ये क्या हो गया या गीतावर कोमल चव्हाण, हिमानी पिले, व रिद्धी सोनवणे यांनी नृत्य सादर केले. रसिक या कार्यक्रमात मंत्रमुग्ध झालेले होते. रविवारची संध्याकाळ रसिकांची या आदारांजलीच्या माध्यमातून सुरेल झाली हे मात्र खरे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.