ट्रेडिंग बझ – काही शेअर्सनी 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अदानी गृपच्या कंपन्यांच्या शेअर्ससह काही बँकिंग आणि डिफेन्स शेअर्सनीही गुंतवणूकदारांना प्रचंड नफा दिला आहे. चला तर जाणून घेऊया या वर्षाच्या आउटपरफॉर्मर स्टॉक्सबद्दल …..
अदानी गृपची कंपनी, अदानी एंटरप्रायझेस 2022 मध्ये मल्टीबॅगर स्टॉक म्हणून नोंदवला गेला आहे. या वर्षी आतापर्यंत या शेअर मध्ये सुमारे 125 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत 76 टक्के नफा गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे. हरित ऊर्जा, विमानतळ बांधकाम, सिमेंट, डेटा सेंटर्स आणि मीडिया यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये कंपनी वेगाने विस्तारत आहे.
मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ या आधारावर, बँक ऑफ बडोदा या PSU बँक स्टॉकने 2022 मध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला आहे. 2022 मध्ये हा स्टॉक 110 टक्क्यांनी वाढला आहे.
या वर्षी डिफेन्स शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. त्यांचे नेतृत्व भारत डायनॅमिक्स लिमिटेड स्टॉक करत आहेत. या डिफेन्स शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत 130 टक्के वाढ नोंदवली आहे. या कालावधीत बेंचमार्क बीएसई सेन्सेक्सने 2 टक्के परतावा दिला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कर्नाटक बँकेने सर्वकालीन उच्च नफा मिळवला आहे. उत्कृष्ट त्रैमासिक निकालांमुळे कर्नाटक बँकेच्या शेअर्स मध्ये वाढ होत राहिली. 2022 मध्ये याखाजगी बँकेच्या शेअरने 135% मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
वार्षिक आधारावर, या रक्षा शेअर्सने 105% मल्टीबॅगर परतावा दिला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही एक लार्जकॅप नवरत्न कंपनी आहे.
महाराष्ट्रात 84% स्ट्राइक रेटसह भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. 288 जागांपैकी 200 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याच्या तयारीत...