ट्रेडिंग बझ – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे. त्याचवेळी रविवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळ देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्कानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राज्यानुसार बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेतला जातो.
दर यादी काय आहे :-
देशाची राजधानी दिल्लीत रविवार 18 डिसेंबर रोजी पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.
इथाइल अल्कोहोलवर टॅक्स वजा :-
दरम्यान, पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी रिफायनरींना पुरवल्या जाणाऱ्या इथाइल अल्कोहोलवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने शनिवारी झालेल्या बैठकीत हा कर सध्याच्या 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्याची शिफारस केली आहे.