ट्रेडिंग बझ :- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 93 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्यानंतरही रविवारी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. व आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. तर जळगावात पेट्रोल 107.80 आणि डिझेल 94.33 प्रती लिटर नुसार आहे यात कोणताही बदल झालेला नाही. मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्काच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेतला जातो.
तुमचे आणि तुमच्या शेजारचे शहराचे दर याप्रमाणेतपासा :-
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज एसएमएसद्वारे देखील तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 नंबरवर आरएसपी पाठवू शकतात आणि एचपीसीएल ग्राहक 9222201122 क्रमांकावर एचपीपीआरआयसीई पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवू शकतात.