ट्रेडिंग बझ :- वाहन उद्योगात कार्यरत असलेली एक मिड-कॅप कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देणार आहे. ही कंपनी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के लाभांश (डिव्हिदडेंट) देणार आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र स्कूटर्सवर कर्ज नाही. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की ती 31 मार्च 2013 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक शेअरवर 1000% अंतरिम लाभांश देत आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर चक्क 100 रुपये लाभांश मिळेल. अंतरिम लाभांश 10 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा जवळ जमा केला जाईल.
कंपनीचे शेअर्स ₹ 25पासून ते ₹ 5000 रुपयांच्या पुढे पोहोचले :-
महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिला आहे. 6 नोव्हेंबर 2001 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 25 रुपयांच्या पातळीवर होते. 16 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र स्कूटर्सचे शेअर्स BSE वर 5140 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 6 नोव्हेंबर 2001 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 2.05 कोटी रुपये झाले असते.
10 वर्षांत 1 लाख रुपयांचे 15 लाखांहून अधिक :-
महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. 14 सप्टेंबर 2012 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 337.25 रुपयांच्या पातळीवर होते. महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडचे शेअर्स 16 सप्टेंबर 2022 रोजी BSE वर रु.5140 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. जर 10 वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 15.24 लाख रुपये झाले असते. महाराष्ट्र स्कूटर्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5309.05 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची निम्न पातळी 3319.15 रुपये आहे