यावेळी लाभांश (डिव्हीडेंट) वाटपाची स्पर्धा लागली आहे. आता या यादीत आणखी एक कंपनी सामील झाली आहे. ही कंपनी दुसरी कोणी नसून Pfizer आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत पात्र शेअर होल्डरांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश(डिविडेंट) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.
सेबी नियामकाला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, “कंपनीची बोर्डाची बैठक मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी झाली. या बैठकीत गुंतवणूकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 30 रुपये लाभांश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना कंपनीकडून 300 टक्के लाभांश दिला जाईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2022 ला किंवा त्यापूर्वी दिला जाईल. फायझरने 20 सप्टेंबर 2022 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे.
कंपनी बद्दल माहिती :-
बहुराष्ट्रीय फार्मा कंपनी फायझरने 1996 मध्ये भारतीय शेअर बाजारात प्रवेश केला. लस, रुग्णालय, अंतर्गत औषधांचा व्यापार करणाऱ्या फायझरच्या शेअर्समध्ये यावर्षी मोठी घसरण झाली आहे. कंपनीचे शेअर्स NSE वर 15 टक्क्यांहून अधिक घसरून 4311 रुपयांवर व्यवहार करत होते. त्याचवेळी, गेल्या एक वर्षाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या शेअरची किंमत 29 टक्क्यांनी घसरली आहे. फायझरची कोविड लस यूएस मार्केटमध्ये उपलब्ध आहे.