ट्रेडिंग बझ- Sikko Industries Limited (सिक्को इंडस्ट्री ली.) चा शेअर मंगळवारी 2.15 टक्क्यांनी वाढून 133 रुपयांच्या पातळीवर गेला, गेल्या पाच दिवसांत हा शेअर सुमारे 7 टक्क्यांनी घसरला आहे. तथापि, जुलैमध्ये त्याच वेळी शेअरची किंमत सुमारे 43.30 रुपयांवरून सध्याच्या पातळीवर पोहोचली आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना अवघ्या तीन महिन्यांत 210 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. आता कंपनीने बोनस शेअर्स देण्याची देखील घोषणा केली आहे.
एका वर्षात 228% परतावा :-
कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 40 रुपयांवरून सध्याच्या पातळीवर वाढले आहेत, याचा अर्थ गेल्या एका वर्षात कंपनीने 228 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स देण्यास मान्यता दिली आहे. बोनस 1:2 च्या प्रमाणात जारी केला जाईल. याचा अर्थ शेअरहोल्डरांच्या प्रत्येक शेअरसाठी, दोन नवीन शेअर जारी केले जातील. यासाठी 28 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. सिको इंडस्ट्रीज लिमिटेड ही सेंद्रिय कृषी कीटकनाशके, बुरशीनाशके, जैव बुरशीनाशके, वनस्पती वाढ उत्तेजक, एनपीके खते, तणनाशके, एचडीपीई बाटल्या आणि लवचिक पाऊचची अग्रणी उत्पादक आणि पुरवठादार आहे.
सलग तिसऱ्या आठवड्यातही भारतीय शेअर बाजारात तेजी कायम
2 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सकारात्मक तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक...