जळगाव दि.७ – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित व ४ फेदर्स बॅडमिंटन अॅकॅडमी आयोजित स्वर्गीय विनोद (बंटी भाई) जवाहरानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ “जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप-२०२३” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जुलै ते २३ जुलै २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी तसेच पुरुष आणि महिला खुलागट व ३५+ वर्षावरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा स्वरूपात घेतल्या जातील. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात नाव नोंदणीची अंतिम दिनांक १६ जुलै २०२३ असून संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी किशोर सिंह (९४२११२११०६) यावर संपर्क साधावा. किंवा पत्ता:- जैन स्पोर्ट्स अकॅडमी, कांताई सभागृह, नवीन बस स्टॅन्ड जवळ, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अतुल जैन व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन यांचे अध्यक्ष डॉ. तुषार उपाध्ये यांनी केले आहे.
प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे निधन
जळगाव : प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे मेंदू मधे रक्तस्त्राव (sub arachnid brain hemorrhage) झाल्याने दुःखद निधन झाले....