कैपिटल मार्केट चा नियामक सेबी (SEBI) ने2 कंपन्या आणि 7 व्यक्तींवर 2.46 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्यक्तींवर करण्यात आलेल्या कारवाईत दोन्ही कंपन्यांच्या प्रवर्तकांचाही समावेश आहे.
Talwalkars Better Value Fitness Ltd आणि Talwalkars Healthclubs Ltd, SEBI ने या दोन कंपन्यांवर कारवाई केली आहे. या कंपनीच्या प्रवर्तकांची नावे अशी : गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, मधुकर तळवकर, विनायक गावंडे, अनंत गावंडे, हर्षा भटकळ.
फसवणूक आणि अनुचित व्यापार पद्धतीमुळे बाजार नियामकाची ही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच नियामकाने गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, मधुकर तळवकर, विनायक गावंडे, अनंत गावंडे, हर्षा भटकळ आणि गिरीश नायक यांना बाजारातून वेगवेगळ्या कालावधीसाठी बंदी घातली आहे.
या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सेबीने गिरीश तळवकर, प्रशांत तळवकर, अनंत गावंडे आणि हर्षा भटकळ यांना प्रत्येकी ३६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. विनायक गावंडे आणि मुधकर तळवकर यांना प्रत्येकी 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गिरीश नायक यांना १८ लाखांचा दंड तर तळवलकर्स हेल्थक्लब्स लिमिटेडला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या सातही जणांना 18 महिन्यांसाठी मार्केटमधून बंदी घालण्यात आली आहे. त्याला कोणत्याही लिस्टेड कंपनीशी निगडीत राहण्यासही मनाई करण्यात आली आहे. खरं तर, सेबीकडे ऑगस्ट-ऑक्टोबर 2019 दरम्यान या लोकांविरुद्ध अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या.