नवी दिल्ली – शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी विक्रमी उच्चांकाने झाली. बीएसईच्या 30 – शेअर बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्सने 59000 चा नवा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे निफ्टीने 17,575 ची पातळी पार केली. हेवीवेट आयटीसी (आयटीसी), इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँकेच्या समभागांनी शेअर बाजारात चांगला पाठिंबा मिळवला. गुंतवणूकदारांना बाजारात 70 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा नफा झाला.
जवळपास अर्धा तास व्यापार केल्यानंतर बाजार काही प्रमाणात घसरला. प्रमुख समभाग असलेल्या टाटा स्टील, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी, टायटन, मारुती, एसबीआय आदींनी शेअर्सच्या झालेल्या घसरणीमुळे बाजारात दबाव आणला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये संमिश्र व्यापार दिसून येत असतांना बीएसई मिडकॅप निर्देशांक 0,13 टक्के वाढीसह व्यापार सुरु आहे. दरम्यान बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 0.07 टक्क्याने घसरला. दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये दुसऱ्या दिवशीही वाढ कायम राहिली. व्होडाफोन आयडिया (15 टक्के), एमटीएनएल (0.79 टक्के) चे समभाग फायद्यासह व्यापार करत आहेत.
सलग तिसऱ्या आठवड्यातही भारतीय शेअर बाजारात तेजी कायम
2 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सकारात्मक तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक...