ट्रेडिंग बझ – शेअर बाजारात आज जास्त उत्साह दिसत आहे. सलग सातव्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स 258 अंकांच्या वाढीसह 63357 स्तरावर तर निफ्टी 113 अंकांच्या वाढीसह 18871 पातळीवर उघडला. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी वाढला आहे आणि 63500 च्या वर व्यापार करत आहे. निफ्टी देखील 18875 च्या वर व्यवहार करत आहे. शेअर बाजार रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. फेडरल रिझव्र्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या विधानानंतर आज रुपयात वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत तो 35 पैशांच्या मजबूतीसह 81.07 च्या पातळीवर उघडला. बुधवारी रुपया 81.42 वर बंद झाला होता.
जागतिक बाजारपेठेची स्थिती :-
सध्या टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये तेजी आहे. फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी येत्या बैठकीमध्ये व्याजदरांबाबत मवाळ भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर अमेरिकन बाजारात बंपर तेजी आली. बुधवारी डाऊ जोन्स 737 अंकांनी म्हणजेच 2.18 टक्क्यांनी, एस अँड पी 500 122 अंकांनी म्हणजेच 3.09 टक्के आणि नॅस्डॅक 484 अंकांनी म्हणजेच 4.41 टक्क्यांनी वाढून बंद झाला होता.