सर्वात जुन्या कंपनीपैकी एक टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीने परिशिष्टात काही महत्त्वाची माहिती दिली आहे म्हणजेच बाजार नियामक सेबीला सादर केलेला अतिरिक्त माहितीचा कागद. ३ ऑक्टोबर रोजी टाटा टेक्नॉलॉजीजनं (Tata Technologies) सेबीला (SEBI) त्यांच्या आयपीओच्या डीआरएचपीसाठी (DRHP) अडेन्डम सादर केले आहे. या IPO अंतर्गत कंपनी 9 कोटी 57 लाख 8 हजार 984 पर्यंत शेअर्स जारी करू शकते. जवळपास दोन दशकांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा IPO येत आहे. 28 जून 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO ला SEBI कडून मंजुरी मिळाली.
सेबीला सादर केलेल्या परिशिष्ट पत्रानुसार दर्शनी मूल्य प्रति शेअर 2 रुपये ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या प्रवर्तक टाटा मोटर्स लिमिटेडद्वारे 81133706 पर्यंतचे शेअर्स OFS अर्थात ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जाऊ शकतात. तसेच, अल्फा टीसी होल्डिंगद्वारे 9716853 शेअर्स जारी केले जातील. टाटा कॅपिटल ग्रोथ फंड द्वारे 4858425 पर्यंत शेअर्स देखील जारी केले जाऊ शकतात.
यासोबतच आयपीओमधील काही भाग कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो. परिशिष्ट कागदपत्रांनुसार, पोस्ट ऑफर इक्विटी शेअर्सपैकी 0.50 टक्के पर्यंत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवता येतात. टाटा मोटर्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी 10% पर्यंत इक्विटी शेअर्स आरक्षित केले जाऊ शकतात.
कर्मचारी आरक्षण श्रेणीमध्ये कमाल 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. पण, सुरुवातीचे आरक्षण फक्त 2 लाख रुपयांपर्यंत असेल. आणि असाही विचार केला जातो की, जर या IPO मध्ये सबस्क्रिप्शन कमी असेल तर कर्मचारी आरक्षण श्रेणीची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवता येईल.
टाटा मोटर्सचे भागधारक राखीव श्रेणीतील जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेअर्ससाठी बोली लावू शकतात. त्याच प्रकारे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान राखीव 35% असेल. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी किमान 15 टक्के राखीव असेल.
तसेच, टाटा मोटर्स OFS अंतर्गत आपला 20 टक्के हिस्सा विकत आहे. 2.40 टक्के हिस्सा अल्फा टीसी होल्डिंगद्वारे विकला जात आहे आणि 1.20 टक्के हिस्सा टाटा कॅपिटल ग्रोथद्वारे विकला जात आहे.