एकामागून एक कंपनी त्यांचे तिमाही २ निकाल अपडेट करत आहे. आज देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या (2023-24) जुलै-सप्टेंबरमध्ये कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 7.9 टक्क्यांनी वाढून 59,692 कोटी रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत, म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23 च्या 2 तिमाहीत ते 55,309 कोटी रुपये होते. सप्टेंबर तिमाहीत TCS चा निव्वळ नफा 8.7 टक्क्यांनी वाढून 11,342 कोटी रुपये झाला आहे. टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 10,431 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
सप्टेंबर तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा ऑपरेटिंग नफा 9.1 टक्क्यांनी वाढून 14,483 कोटी रुपये झाला आहे, तर ऑपरेटिंग मार्जिन (नफा) 0.25 टक्क्यांनी वाढून 24.3 टक्के झाला आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनेही तिमाही 2 च्या निकालांमध्ये प्रति शेअर 9 रुपये लाभांश (dividend) जाहीर केला आहे.