सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या सरकारच्या योजनेच्या निषेधार्थ 17 डिसेंबर रोजी बँक संघटनाही संपावर जात आहेत. बँक संपाचा परिणाम एसबीआय, पीएनबी, सेंट्रल बँक आणि आरबीएल बँकेच्या कामकाजावर होऊ शकतो. चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर, डेबिट कार्डशी संबंधित काम आज आणि उद्या अडकू शकते.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नंतर, आणखी तीन बँका, पंजाब नॅशनल बँक (PNB), सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि RBL बँक यांनी सांगितले होते की बँक संपामुळे त्यांच्या कामावर परिणाम होईल.
आजही संप कायम
आज, शुक्रवार 17 डिसेंबर रोजी बँक कर्मचाऱ्यांचाही संप आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) बँकांच्या खाजगीकरणाला विरोध करत असून या निषेधार्थ ते दोन दिवसीय संपावर जात आहेत. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनचे (AIBOC) सरचिटणीस संजय दास म्हणाले की PSBs च्या खाजगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राधान्य क्षेत्राला धक्का बसेल. याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेतील पतपुरवठा आणि बचत गटांना फटका बसेल.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने संपाची नोटीस दिल्याची माहिती इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) कडून देण्यात आली आहे, अशी माहिती देत UBFU च्या युनियनच्या इतर सदस्य युनियन जसे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC NCBE. , AIBOA, BEFI, INBEF आणि INBOC यांनी त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ देशव्यापी बँक संपावर जाण्याचा प्रस्ताव दिला आहे.