आता तुम्हाला लवकरच बँकेच्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी आरबीआयने नवा नियम जारी केला आहे. देशातील सर्व बँका आणि एटीएम मशीनमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल.
रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी एक परिपत्रक जारी करून सर्व बँकांना ही सुविधा लवकरच सुरू करण्यास सांगितले आहे. परिपत्रकात, आरबीआयने सर्व बँका, एटीएम नेटवर्क आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAO) यांना त्यांच्या एटीएममध्ये इंट्राऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) ची सुविधा देण्यास सांगितले आहे. ही सुविधा UPI च्या माध्यमातून घेता येते.
ही System काय आहे ? :-
एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डची गरज नाही. ही सुविधा देशभरात 24×7 उपलब्ध असेल. या प्रणालीद्वारे मोबाईल पिन तयार करावा लागेल. कॅशलेस कॅश काढण्याच्या सुविधेत, व्यवहार UPI द्वारे पूर्ण केला जाईल. स्वतःहून पैसे काढल्यावरच ही सुविधा मिळेल. सध्या सर्व बँकांमध्ये ही सुविधा नाही. यामध्ये 5 हजारांची व्यवहार मर्यादा आहे.
ही system कशी काम करेल ? :-
-यामध्ये तुम्हाला एटीएम मशीनवर जाऊन त्यावर पैसे काढण्याचा पर्याय निवडावा लागेल.
-यानंतर एटीएमच्या स्क्रीनवर UPI ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
-यानंतर एटीएमवर क्यूआर कोड दिसेल.
-तुमच्या मोबाइलवर उपलब्ध असलेले UPI पेमेंट अप उघडा आणि त्याद्वारे हा QR कोड स्कॅन करा.
-त्यानंतर तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाका.
-यानंतर, तुम्हाला तुमचा UPI पिन भरावा लागेल आणि Proceed बटणावर क्लिक करावे लागेल.
-आता तुमचे पैसे एटीएममधून काढले जातील.
https://tradingbuzz.in/7500/
Comments 1