ट्रेडिंग बझ – गेल्या आठवडाभरापासून अदानी समूहातील कंपन्या त्यांच्या गुंतवणूकदारांचे नुकसान करतांना दिसत आहे. अदानी विल्मर 13 टक्क्यांहून अधिक तर अदानी पॉवरने 12 टक्क्यांहून अधिक घसरली आहे. याशिवाय अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन, अदानी पोर्ट्स, अदानी गॅस यांचीही अवस्था बिकट आहे.आजही सुरुवातीच्या व्यवहारात अदानी टोटल गॅस 1.10 टक्क्यांनी घसरून 3011 रुपयांवर व्यवहार करत होता. तर, अदानी पोर्ट्स 783 रुपयांवर हिरव्या चिन्हासह होते.अदानी ग्रिन तेजीत आहे, तर अदानी विल्मार 1.43 टक्क्यांनी घसरून 645.50 रुपयांवर व्यवहार करत आहे. अदानी पॉवरमध्ये सर्वाधिक 3.09 टक्के घसरण झाली.अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीमुळे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या मालमत्तेवरही परिणाम झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती 123 अब्ज डॉलरवर आली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत अदानी अजूनही चौथ्या क्रमांकावर आहे. या वर्षी शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्यांची संपत्ती $8.9 बिलियन वरून $121 बिलियन झाली
सलग तिसऱ्या आठवड्यातही भारतीय शेअर बाजारात तेजी कायम
2 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सकारात्मक तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक...