नवी दिल्ली : शेअर बाजारात आज योग्य रितीने वाढ झाली आहे. मात्र व्यवसाय संपण्यापुर्वीच बाजाराने कमावलेला नफा गमावत सपाट स्तरावर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स आज 14.25 अंकांच्या किंवा 0.03 टक्क्यांच्या वाढीसह 52,588.71 वर क्लोज झाला. त्यासोबतच निफ्टी 26.25 अंकांच्या अथवा 0.17 टक्क्यांच्या जोरावर 15,772.75 वर क्लोज झाला. आजच्या इंट्रा डे मधे सेन्सेक्सने एक नवा अध्याय नोंदवत 53 हजारांची पातळी ओलांडली.
4 दिवसांच्या घसरणीनंतर आज ऑटो शेअर्समध्ये वाढ समोर आल्याचे आढळून आले. आजच्या व्यवसायात पीएसयु बँक, रियल्टी, सिमेंट शेअर्सची खरेदी आज दिसून आली. दरम्यान दुसरीकडे, फार्मा शेअर्समध्ये किंचित नफ्याची बुकींग होती. सेन्सेक्सने आज विक्रमी उच्चांक गाठत 53 हजारांची उंची मिळवली. सेन्सेक्सच्या टॉप तिस शेअर्सपैकी बारा शेअर्स ग्रीन मार्कने क्लोज झाले. याशिवाय अठरा शेअर्सची विक्री झाली. त्यात मारुती 5 टक्के वाढीसह टॉप गेनर्सच्या यादीत पुढे आहे. एलटी, टीसीएस, अल्ट्रा, इन्फोसिस, टायटन, डॉ. रेड्डी, बजाज ऑटो, टाटा स्टील, आयटीसी, एचडीएफसी आणि एनटीपीसी या शेअर्सची देखील चांगली खरेदी दिसून आली.
याशिवाय एशियन पेंट्स विक्री-झालेल्या शेअर्सच्या यादीत 1.9 टक्के घसरण झाली. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, एचसीएल, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, आरआयएल, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, सन फार्मा, कोटक बँक, इंडसइंड बँक, एचयूएल आणि एशियन पेंट्समध्ये चांगली विक्री झाली.
महाराष्ट्रात 84% स्ट्राइक रेटसह भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. 288 जागांपैकी 200 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याच्या तयारीत...