सध्या शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात तेजीत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात सेन्सेक्सने 53 हजारांची मर्यादा पार केली होती. गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस थोडेफार मंदीचे गेले. मागील वर्षात अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा करुन दिला आहे. यातील एक शेअर म्हणजे सुबेक्स असल्याचे म्हटले जात आहे.
आयटी स्टॉक सुबेक्सने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा करुन दिला आहे. बंगळुरु येथील या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरचा भाव 9 जुलै 2020 रोजी 7.82 रुपये इतका होता. शुक्रवारी एनएसईवर या शेअरचा भाव 71.15 रुपयांवर गेला. पोहोचला. गेल्या वर्षात या शेअरने जवळपास 837.34 % परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यात हा शेअर दीडपटीने झाला आहे.
महाराष्ट्रात 84% स्ट्राइक रेटसह भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. 288 जागांपैकी 200 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याच्या तयारीत...