शेअर बाजारात ‘बिग बुल’ म्हणून समजले जाणारे राकेश झुनझुनवाला यांची ख्याती आहे. त्यांनी घेतलेले शेअर्स चांगला रिटर्न देणार असे गुंतवणूकदार समजतात. गेल्या वर्षी झुनझुनवाला यांनी खरेदी केलेल्या एका पेनी स्टॉकने वर्षभरात गुंतवणूकदारांना तब्बल 190 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीचा शेअर गेल्या 12 महिन्यात वेगवान ठरला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या शेअरची किंमत 32.05 रुपये एवढी होती. मंगळवारी या शेअरची किंमत 92.85 रुपयांवर गेली. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 190 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्स देखील 45 टक्क्यांनी वाढला आहे.
मागील वर्षी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांना या शेअरने तब्बल 14.48 लाख रुपयांची कमाई करुन दिली. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 59 टक्क्यांनी वाढला. हैद्राबादच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांच्यासह त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची 12.84 टक्के एवढी भागिदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 6 कोटी 67 लाख 33 हजार 266 शेअर (10.94 टक्के) आणि त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 16 लाख शेअर (1.90 टक्के) आहेत.
प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे निधन
जळगाव : प्रोफेसर डॉ. सौ. संगीता विजयसिंग पाटील यांचे मेंदू मधे रक्तस्त्राव (sub arachnid brain hemorrhage) झाल्याने दुःखद निधन झाले....